ऑक्सिओम-4 मिशनला ‘मुहूर्त’ मिळेना! आता 22 जूनची तारीख

ऑक्सिओम-4 मिशनला ‘मुहूर्त’ मिळेना! आता 22 जूनची तारीख

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे ऑक्सिओम-4 मिशन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. हे मिशन सलग पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. 19 जून 2025 ला फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण होणार होते, परंतु त्याआधीच याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता प्रक्षेपणाची नवी तारीख 22 जून 2025 दिली आहे. या मिशनमध्ये चार देशांचे चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत. या मोहिमेचे उद्या, 19 जूनला उड्डाण होणार होते. हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळावर जाणार आहेत. या ठिकाणी अभ्यास करून ते पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. ऑक्सिओम-4 मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. यापूर्वी ही मोहीम 29 मे 2025 रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ते 8 जून, 10 जून, 11 जून आणि 19 जून अशी सलग चौथ्यांदा पुढे ढकलत एकूण पाच वेळा ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;