Milk Rice Benefits- दररोज रात्री दूध भात खाल्ल्याने आरोग्यासाठी ‘5’ जबरदस्त फायदे होतील, वाचा

Milk Rice Benefits- दररोज रात्री दूध भात खाल्ल्याने आरोग्यासाठी ‘5’ जबरदस्त फायदे होतील, वाचा

आपल्यापैकी बहुतेकांना रात्रीच्या जेवणात भात खायला आवडतो. भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवल्यासारखे वाटत नाही. तसेच आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, दूध आणि भात एकत्र खाण्याचेही खूप फायदे आहेत. दूध आणि भात केवळ जिभेचे चोचले पुरवणार नाही तर याचे आरोग्यासाठीही खूप सारे फायदे आहेत.

रात्री दूध आणि भात खाणे कसे फायदेशीर आहे?

दूध आणि भात दोन्ही पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहेत. प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, डी सारखे आवश्यक पोषक तत्व दुधात मुबलक प्रमाणात असतात. त्याच वेळी भातामध्ये थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि सोडियमने समृद्ध असतो. रात्री दूध भात खाल्ल्याने चांगली झोप येते, मेंदू शांत होतो आणि आरामदायी वाटते.

कॅल्शियमने समृद्ध असलेले दूध भात हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. ते हाडे मजबूत करते आणि सांधेदुखी इत्यादी समस्या दूर करते. तसेच हाडांमधील फ्रॅक्चरचा धोका कमी करते.

 

दात मजबूत करण्यासोबतच, दूध आणि भात हिरड्या मजबूत करण्यासाठी आणि त्यांना घट्ट ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

फायबरने समृद्ध असल्याने, दूध भात पचन सुधारण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अतिसाराच्या समस्येत दूध आणि भात खाणे खूप फायदेशीर आहे.

 

रात्री जेवणानंतर काहीतरी खाण्याची इच्छा होते. दूध आणि भात खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि रात्री भूक लागत नाही. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.

 

कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी दूध भात समृद्ध असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

 

Curd Rice Benefits- जेवणाची सांगता करताना दही भात खाणे का महत्त्वाचे आहे? वाचा यामागची आर्युर्वेदीय कारणे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;