‘काशीकाकांनी आईसमोरच वडिलांना मारून टाकलं’, मुलाच्या जबानीनंतर महिलेला अटक; मुलगा झाला पोरका

‘काशीकाकांनी आईसमोरच वडिलांना मारून टाकलं’, मुलाच्या जबानीनंतर महिलेला अटक; मुलगा झाला पोरका

गेल्या काही दिवसात पत्नीकडून पतीच्या हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सोनम राजा रघुवंशी या प्रकरणात दररोज धक्कादायक सत्य समोर येत आहे. संपूर्ण देशभरातून अशी प्रकरणं समोर येत असताना दरम्यान राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खरेली गावातूनही एक अशीच घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

मानसिंग जाटव असे त्या मृत व्यक्तीचे नाव असून त्याचे दहा वर्षांपूर्वी अनितासोबत लग्न झाले होते. मानसिंग व अनिता यांना एक नऊ वर्षांचा मुलगा देखील होता. अनिताचे काशीराम प्रजापती नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होतं. त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये त्यांना मानसिंगचा अडसर होता. त्यामुळे त्यांनी मानसिंगच्या हत्येचा कट रचला होता.

7 जूनच्या रात्री काशीराम हा त्याच्या चार मित्रांना घेऊन मानसिंगच्या घरी आला. त्यावेळी मानसिंग व त्याचा मुलगा झोपलेला होता. त्यावेळी काशीरामने व त्याच्या चारमित्रांनी मानसिंगचे तोंड उशीने दाबले. तो गुदमरू लागल्यानंतर त्याने हात पाय मारायला सुरुवात केली. त्यावेळी शेजारी झोपलेल्या मुलाने तो प्रकार बघितला. त्याने सुरुवातीला झोपेचं सोंग घेतलं मात्र नंतर जसं त्याला असह्य झालं. त्याने काशीरामला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. पण काशीरामने त्याला याबाबत कुणाला सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे तो सुरुवातीला गप्प राहिला.

दरम्यान अनिताने मानसिंग याचा झोपेतच मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र मानसिंगच्या अंगावरील जखमांमुळे त्याच्या नातेवाईकांना घातपात झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जेव्हा मुलाची चौकशी केली तेव्हा काशीराम काकांनी वडिलांना मारले व तेव्हा आई देखील त्यांच्यासमोरच उभी होती असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अनिताची चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानात एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांत युद्ध होणार अशी...
Air India चा खोळंबा! आज तीन उड्डाणे केले रद्द, कारण काय? वाचा
मल्टिस्टेट बँकेने घेतला शेतकर्‍याचा बळी, ठेव परत मिळत नसल्याने शेतकर्‍याने बँकेच्या दारातच संपवले जीवन
Photo – रविनाची सावली, राशा दिसते गोड बाहुली!
BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? वाचा
Air India Plane Crash – विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, भावाच्या पार्थिवाला खांदा देताना अश्रू अनावर
संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका