तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास

तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास

केंद्र सरकारने तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पासची योजना 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कार, जीप, व्हॅन यांसारख्या गैरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी लागू असेल. योजनेंतर्गत पासवर खासगी वाहने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवरून वर्षभरात 200 वेळा प्रवास करू शकतील. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ही घोषणा केली.

टोल पेमेंट तसेच रस्ते प्रवास सुलभ करण्यासाठी फास्टॅग पास योजना सुरू केली जात आहे. फास्टॅग पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 फेऱयांपर्यत वैध राहणार आहे. आवर्ती टोल शुल्क कमी करून नियमित महामार्ग प्रवाशांचा खर्च कमी करण्याच्या हेतूने फास्टॅग पासचे डिझाइन केले आहे. त्रासमुक्त महामार्ग प्रवासासाठी एक क्रांतिकारक पाऊल म्हणून आम्ही 15 ऑगस्टपासून तीन हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना सुरू करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ‘एक्स’वर आपल्या अधिकृत हॅण्डलवरून जाहीर केले. हा वार्षिक पास देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर चालणार आहे. पास सक्रिय व नूतनीकरण करण्यासाठी महामार्ग अॅप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर एक समर्पित लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वर्षभरात वाहनधारकांचे 10 हजार रुपये वाचणार

फास्टॅग पासमुळे वर्षभरात वाहनधारकांचे 10 हजार रुपये वाचणार आहेत. सध्या प्रत्येक टोलनाक्यावर 50 ते 80 रुपयांपासून पुढे टोल आकारला जातो. फास्टॅग पासमुळे तो फक्त 15 रुपये लागेल. यामुळे पैसे वाचण्याबरोबर वेळेची बचत होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राज्य सरकार किंवा इतर सरकारी प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर हा पास चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे फायदे होणार

  • टोलनाक्यावर कर देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
  • टोलनाक्यावरील वाहनधारकांची रखडपट्टी टळेल.
  • टोलनाक्यावर गर्दी नियंत्रणात राहिल्याने वाद होणार नाहीत.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;