अमरनाथ यात्रेच्या मार्गावर ड्रोनला बंदी
3 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत चालणाऱया अमरनाथ यात्रेच्या मार्गावर ड्रोनला बंदी घालण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जम्मू आणि कश्मीर सरकारने संपूर्ण यात्रा मार्ग ‘नो फ्लाइंग झोन’ म्हणून घोषित केला आहे. पहलगाम हल्ला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेच्या पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवर सर्व प्रकारच्या हवाई उपकरणे – ड्रोन, यूएव्ही आणि फुगे यांच्या वापरावर बंदी घालण्यात येईल. हा निर्णय 1 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान लागू असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List