G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो

G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो

कॅनडा आयोजित G7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

G7 परिषदेसाठी कॅनडातील काननास्किस येथे जगातील प्रमुख देशांचे नेते एकत्र आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी परिषदेत सहभाग घेतला आहे. मेलोनी यांनी शेअर केलेल्या फोटोत दोन्ही नेते हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

दरम्यान, कॅनडात आयोजित G7 परिषदेत अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि युनायटेड किंगडम या देशांचे नेते सहभागी झाले होते. हिंदुस्थानला विशेष आमंत्रित देश म्हणून या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, युद्धजन्य परिस्थिती, पर्यावरणीय बदल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;