संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका

संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी याला लोकशाही आणि संविधानाची थट्टा असल्याचे म्हटले असून, पश्चिम बंगालमध्ये हा दिवस साजरा केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आणि संवैधानिक मूल्यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.

याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “केंद्र सरकार म्हणते की, यावर्षी आपातकालाच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाईल. मी संविधान हत्या या शब्दप्रयोगावर आक्षेप नोंदवते. संविधान हे आपल्या अधिकारांचा आधार आहे, लोकशाहीची जननी आहे. ते (भाजप) याला संविधान हत्या कसे म्हणू शकतात?” त्यांनी केंद्र सरकारवर संविधान आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा अनादर केल्याचा आरोप केला.

ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, जे लोक संविधानाचा आदर करत नाहीत, ते आता त्याच्या नैतिकतेची भाषा करत आहेत. हा ढोंगीपणा आहे. जे लोक दररोज लोकशाही आणि संविधानिक रचनेवर हल्ला करतात, त्यांच्याकडून लोकशाहीवरील व्याख्याने ऐकण्याची आमची इच्छा नाही,” असे त्या म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;