सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. इराणी सरकारी माध्यमांनुसार, खमेनी यांनी स्पष्ट केले आहे की, “इराण कधीही सरेंडर नाही. जर अमेरिकेने कोणताही लष्करी हल्ला केला तर, त्याचे परिणाम खूप वाईट होतील, जे कधीही भरून काढता येणार नाहीत.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांना बिनशर्त आत्मसमर्पणा करण्यास सांगितलं होतं. ट्रम्प यांनी म्हटले होते की, अमेरिकेला खामेनेई कुठे लपले आहेत हे माहित आहे आणि त्यांना सहज लक्ष्य करता येऊ शकते. यावर प्रतिक्रिया देताना खामेनी म्हणाले, “ज्यांना इराणचा इतिहास माहित आहे ते धमक्यांची भाषा बोलत नाहीत.”

खामेनी यांनी त्यांच्या संदेशात इराणी जनतेचे कौतुक केले आणि म्हटले की, “इस्रायली हल्ल्यांनंतर लोकांचा संयम आणि धाडस हे त्यांच्या राष्ट्रीय सामर्थ्याचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, इराणी राष्ट्र कोणत्याही लादलेल्या युद्धापुढे झुकणार नाही आणि कोणताही लादलेला शांतता करारही स्वीकारणार नाही.”

दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सहाव्या दिवशीही सुरू आहे. इस्रायलने इराणच्या राजधानी तेहरानवर हवाई हल्ले केले, तर इराणनेही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानात एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांत युद्ध होणार अशी...
Air India चा खोळंबा! आज तीन उड्डाणे केले रद्द, कारण काय? वाचा
मल्टिस्टेट बँकेने घेतला शेतकर्‍याचा बळी, ठेव परत मिळत नसल्याने शेतकर्‍याने बँकेच्या दारातच संपवले जीवन
Photo – रविनाची सावली, राशा दिसते गोड बाहुली!
BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? वाचा
Air India Plane Crash – विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, भावाच्या पार्थिवाला खांदा देताना अश्रू अनावर
संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका