ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते

ट्रम्प काही हटेना मोदींचा पिच्छा सुटेना! पुन्हा म्हणाले युद्ध थांबवण्यासाठी मोदी सकारात्मक होते

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानात एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांत युद्ध होणार अशी परिस्थिती असतानाच अचानक हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाली. युद्धबंदीसाठी पाकिस्तानने विनंती केल्याचे सांगण्यात आले होते. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये मी व्यापाराची अट टाकून युद्धबंदी घडवून आणल्याचा दावा केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिनाभरात अनेकदा ही युद्धबंदी त्यांच्यामुळे झाल्याचा दावा केला. मात्र हिंदुस्थानकडून एकदाही हा दावा फेटाळण्यात आलेला नाही. सध्या पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अशीम मुनीर हे अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट देखील घेतली.

पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अशीम मुनीर यांच्याबद्दल विचारले. त्यावेळी ते म्हणाले. ”मला पाकिस्तान आवडतो. नरेंद्र मोदी हे एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्तव आहे. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो. आम्ही व्यापाराशी संबंधित एक डिल करणार आहोत. मी हिंदुस्थान पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं. पाकिस्तानकडून अशीम मुनीर आणि हिंदुस्थानकडून नरेंद्र मोदी हे दोघे युद्ध थांबवण्यासाठी उत्साही होते. मी या दोन देशांमधील युद्ध थांबवले”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;