15 हजार रुपये पॉकेट मनी आणि घरकामात मदत, पतीच्या या ऑफरवरून पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज मागे

15 हजार रुपये पॉकेट मनी आणि घरकामात मदत, पतीच्या या ऑफरवरून पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज मागे

महिन्याकाठी 15 हजार रुपये पॉकेट मनी आणि घरकामात मदत यावरून एका पत्नीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. एक लग्न जवळपास मोडणार होतं पण कोर्टाने नेमलेल्या मध्यस्थांमुळे हे लग्न वाचलं आहे. अशा प्रकारे मोडणारं लग्न वाचण्याची घटना पहिलीच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2024 मध्ये या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. पण काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडायला सुरूवात झाली. आणि तीन महिन्यानंतर तरुणी माहेरी परतली. त्यानंतर दोघांमध्ये खुपच भांडणं झाली. मुलीने मुलाविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. तर मुलानेही मुलीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांमध्ये वाद इतका वाढला की बाब सर्वोच्च न्यायायलापर्यंत पोहोचला. जानेवारीमध्येही सर्वोच्च न्यायालयाने हे लग्न वाचू शकत नाही अशी भिती व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करण्यापूर्वी मध्यस्थांना काही मार्ग काढण्यास सांगितले. त्यानंतर या दाम्पत्यात मार्ग निघाला. मुलीला महिन्याला 15 हजार रुपयांची पॉकेट मनी, घरकामात मदत आणि दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्याचे ठरले. दाम्पत्याने काढलेला हा मार्ग पाहून न्यायमूर्तीही अवाक झाले होते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;