तांबेडी ग्रामपंचायतीतील कारभाराची चौकशी करा, माजी खासदार विनायक राऊत यांची मांगणी

तांबेडी ग्रामपंचायतीतील कारभाराची चौकशी करा, माजी खासदार विनायक राऊत यांची मांगणी

संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीतील सात पैकी चार सदस्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांनी जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तांबेडी ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी करण्यात यावी अशी मांगणी करताना निवेदनात येथील स्थानिक ग्रामस्थ अजिंक्य ब्रीद यांनी वारंवार या ग्रामपंचायत कार्यालयाकडे विकासकामा संधर्भात माहिती मागवली. कधी तोंडी तर कधी माहितीच्या कायद्या अंतर्गत मात्र प्रत्येक वेळी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली.

या विषयी देवरुखचे गट विकास अधिकारी यांनी कोणतीच दखल न घेतल्याने अजिंक्य ब्रीद यांनी माजी खासदार यांच्याकडे सर्व पुराव्यानिशी तोंडी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत खासदार राऊत यांनी आपल्या पत्रात प्रत्यक्षात कामे न करता कामाची रक्कम काढल्याचे दिसत असल्याने या अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करून तसा अहवाल आपणास मिळावा अशी मांगणी माजी खासदार विनायक राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

नुकतीच तांबेडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती त्यावेळी सरपंच ग्रामसेवक यांनी विकासकामे न करताच पैसे काढल्याचे कबूल केले होते. त्यावेळी तांबेडी ग्रामपंचायत कार्यालयाची सखोल चौकशी करण्याचा ठराव ग्रामस्थांनी एक मतांनी मंजूर केला होता. कार्यालयाची चौकशी करण्याचा ठराव मंजूर होताच तांबेडी ग्रामपंचायतीच्या सात सदस्यापैकी चार सदस्यांनी तात्काळ राजीनामे दिले.

या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ, रिया राजेंद्र ब्रीद,सुप्रिया सुरेश सुतार,सुषमा अशोक तांबे, अजय सदानंद ब्रीद या चौघांनी राजीनामा तर दिला नाही ना ? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. तांबेडी ग्रामपंचायत कार्यालयातील चौघा सदस्यांनी राजीनामा दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;