शत्रू देशांच्या पाणबुड्यांचा काळ! INS Arnala हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल

शत्रू देशांच्या पाणबुड्यांचा काळ! INS Arnala हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल

जगातील सर्वात आधुनिक आणि शक्तिशाली सैन्याच्या यादीत हिंदुस्थानी नौदलाचा समावेश आहे. आता समुद्रात हिंदुस्थानी नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. आज (18 जून) नौदलाने पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस अर्नाळा’ आपल्या ताफ्यात समाविष्ट केली. विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या समारंभात हिंदुस्थानचे संरक्षण दलाचे प्रमुख (CDS) जनरल अनिल अनिल चौहान देखील उपस्थित होते. आयएनएस अर्नाळा शत्रू देशांच्या पाणबुड्यांसाठी काळ ठरणार आहे.

अर्नाळा किल्ल्यावरून ठेवण्यात आलं नाव

महाराष्ट्रातील वसई येथील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून आयएनएस अर्नाळा युद्धनौकेचे नाव देण्यात आले आहे. जे हिंदुस्थानच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतिबिंब आहे. आयएनएस अर्नाळा एका मजबूत किल्ल्याप्रमाणे उभा राहील आणि समुद्रातील विविध धोक्यांविरुद्ध त्याची उपस्थिती दर्शवेल. आयएनएस अर्नाळा मजबूत बांधकाम आणि प्रगत क्षमतांनी सुसज्ज आहे.

‘आयएनएस अर्नाळा ’ हे 16 ASW-SWC युद्धनौकांच्या मालिकेतील पहिले जहाज आहे. ही युद्धनौका गुप्तचर देखरेख, किनारी सुरक्षा, शोध आणि बचाव कार्य, भूपृष्ठाखालील भागात कमी तीव्रतेच्या सागरी ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहेत. हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात अर्नाळाचा समावेश केल्याने देशाच्या नौदल क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. यामुळे किनारी सुरक्षा मजबूत होईल आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या हिंदी महासागर क्षेत्रात एक स्वावलंबी सागरी शक्ती म्हणून हिंदुस्थानचे स्थान आणखी मजबूत होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;