भाजपाशासित गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रातच का? हर्षवर्धन सकपाळ यांचा सवाल

भाजपाशासित गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रातच का? हर्षवर्धन सकपाळ यांचा सवाल

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. या हिंदी सक्तीला काँग्रेसचा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदीची सक्ती लादू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषेदत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, याआधी हिंदी सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला होता व हिंदी सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सक्ती करणार नाही सरकारने जाहीर केले होते पण आता दि. १७ जून २०२५ रोजी जो शासन आदेश जारी केला आहे त्यात केवळ शब्दछल करून हिंदी सक्ती ठेवली आहे, हा देवेंद्र फडणवीस यांचा कावा सर्वांना समजला आहे. केवळ शब्द बदलल्याने त्याचा आशय बदलत नाही. मराठी ही केवळ भाषा नसून ती आमची संस्कृती आहे, ही संस्कृती संपवण्याचा अजेंडा रा. स्व. संघ व भाजपाचा आहे. हिंदू, हिंदी आणि हिंदूराष्ट्र हे गोवलकरांच्या बंच ऑफ थॉट मध्ये आहे, तोच फडणवीस राबवित आहेत पण हे षडयंत्र हाणून पाडू असे सपकाळ म्हणाले.

भाजपाशासित गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रातच ती का केली जात आहे. गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती का नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना विचारावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य विरुद्ध भाजपाचा हिंदुराष्ट्र असा हा लढा असून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याबरोबर आहोत. हिंदी सक्तीचा आता कडलोट करावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आता माफिया दाऊद इब्राहिमचाच भाजपा प्रवेश बाकी…

नाशिकचे सुधाकर बडगुजर यांचे संबंध कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी आहेत त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केले होते आणि आता त्याच बडगुजरला भाजपाने पायघड्या घालून स्वागत केले. आधी इक्बाल मिर्चीशी संबंधित नेत्याच्या पक्षाला सत्तेत घेऊन मिरची गोड करून घेतली व आता कुत्ताशी सोयरिक केली आहे. आता फक्त दाऊद इब्राहिमलाच भाजपात प्रवेश देणे बाकी आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध...
Local Train Update – मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
इंडिगो फ्लाइटचं डोअर झालं लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक प्रवासी 40 मिनिटे विमानात अडकले
मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून चौदा वर्षाच्या मुलाने अकरा वर्षाच्या मुलाचा विजेचा शॉक देऊन केला खून
शत्रू देशांच्या पाणबुड्यांचा काळ! INS Arnala हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल
वाचाल तर वाचाल! 21 राज्यांमध्ये 10 लाख लोकांनी स्वीकारला राष्ट्रीय वाचन दिनाचा संकल्प
कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 4 मृत्यू; देशात काय आहे Covid 19 ची स्थिती? वाचा…