इराणमध्ये अडकलेले 110 विद्यार्थी हिंदुस्थानमध्ये परतले, दिल्लीत उतरताच व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘घरी जायचंय, पण…’

इराणमध्ये अडकलेले 110 विद्यार्थी हिंदुस्थानमध्ये परतले, दिल्लीत उतरताच व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘घरी जायचंय, पण…’

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढला आहे. दोन्ही देश इरेला पेटले आहेत. इस्रायलकडून इराणच्या तेहरान शहरावर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून इराणही त्याला जशास तसे उत्तर देत आहे. दोन्ही देशातील तणाव वाढत असल्याने हिंदुस्थानने इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ केले. या अंतर्गत इराणधून 110 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेले विमान दिल्लीत उतरले आहे.

तेहरानमधील हिंदुस्थानी दुतावासाने उत्तर इराणमधून जवळपास 110 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. देशातील अनेक राज्यामधील या विद्यार्थ्यांना इराणमधून दिल्लीत आणण्यात आले असून तिथून ते आपापल्या राज्यात जात आहे. यात विद्यार्थ्यांमधील बहुतांश जम्मू-कश्मीर येथील आहे. या विद्यार्थ्यांसाठी जम्मू-कश्मीर सरकारने बस पाठवल्या आहेत. मात्र यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून इराणमधून येताना आम्ही थकलो असून प्रवासही लांबलचक झाला. त्यानंतर आता पुन्हा बसमधून 20 तास प्रवास करणे खूप कठीण आहे, असे विद्यार्थी म्हणाले.

माध्यमांशी बोलताना एक विद्यार्थ्याने सांगितले की, ‘आम्ही 20 तासांहून अधिक प्रवास करून हिंदुस्थानमध्ये आलो आहोत. या प्रवासाने आम्ही खूपच थकून गेलो आहोत. त्यानंतर आता पुन्हा बसने 20 तास प्रवास करणे आणि ते देखील अशा बसमध्ये शक्यच नाही.’

जम्मू-कश्मीर सरकारने प्रवासासाठी चांगली व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आम्ही इथे उतरलो तेव्हा पाहिले की विद्यार्थ्यांना नेण्यासाठी जुन्या बस पाठवण्यात आल्या. खरे तर लांबच्या प्रवासासाठी आराम बस पाठवायला हव्या होत्या. या बस लांबच्या प्रवासा लायक नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

आखातातील युद्ध भडकले! इराण आक्रमक पवित्र्यात, शरणागती पत्करणार नाही; इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये 585 लोकांचा मृत्यू

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल