हरवलेल्या 13 बालिका, 45 महिलांचा लावला शोध; शिरूर पोलिसांची दमदार कामगिरी

हरवलेल्या 13 बालिका, 45 महिलांचा लावला शोध; शिरूर पोलिसांची दमदार कामगिरी

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेल्या ४५ महिला व ३५ पुरुष यांचा शोध घेण्यात शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाला यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.

शिरूर शहर, तसेच पोलीस स्टेशन हद्दीतून जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन बालिका घरातून निघून गेल्याबाबत १३ तक्रारी दाखल होत्या. या गुन्ह्यांचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पथकाला अल्पवयीन बालिकांचा तत्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण, बातमीदार यांच्याकडून माहिती काढून कसोशीने तपास केला. आतापर्यंत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमधील १३ अल्पवयीन बालिकांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यश आले आहे.

शिरूर शहर, तसेच पोलीस स्टेशन हद्दीतून ४५ महिला व ३५ पुरुष हरवले असल्याबाबत तक्रारी दाखल होत्या. या प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस हवालदार संपत खबाले, पोलीस अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे, महिला पोलीस अंमलदार सारिका माळी यांची ‘मिसिंग’ शोध पथकामध्ये नेमणूक केली. हरवलेल्या ४५ महिला व ३५ पुरुषांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार नाथसाहेब जगताप, अंमलदार विजय शिंदे, नीतेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, प्रतिभा देशमुख, स्नेहल होळकर, गोदावरी धंदरे, परवीन पप्पूवाले, गीता सुळे व ‘मिसिंग’ पथकाचे पोलीस हवालदार संपत खबाले, अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे, महिला पोलीस अंमलदार सारिका माळी यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;