इंडिगो फ्लाइटचं डोअर झालं लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक प्रवासी 40 मिनिटे विमानात अडकले

इंडिगो फ्लाइटचं डोअर झालं लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक प्रवासी 40 मिनिटे विमानात अडकले

छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी इंडिगोच्या विमानात मोठी तांत्रिक अडचण उद्भवली. दिल्लीहून रायपूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे दार तांत्रिक बिघाडामुळे अंदाजे 40 मिनिटे उघडले गेले नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, आमदार चतुरी नंद, रायपूरच्या महापौर मीनल चौबे यांच्यासह शंभरहून अधिक प्रवासी विमानात अडकून पडले.

इंडिगो विमान दुपारी 2:25 वाजता रायपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं. मात्र विमानाच्या दरवाज्यातील तांत्रिक बिघाडामुळे तो उघडला जाऊ शकला नाही. परिणामी यात्रींना रनवेवर विमानातच बसून राहावे लागले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. अभियंत्यांनी सुमारे 40 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर दार उघडले, आणि सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले. कोणालाही कोणतीही इजा झाली नाही.

भूपेश बघेल जे या विमानातून प्रवास करत होते, त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे दार उघडण्यास विलंब झाला. सुमारे 40 मिनिटे आम्हाला विमानातच थांबावे लागले. अभियंत्यांनी ही समस्या सोडवली आणि सर्व यात्री सुरक्षितपणे बाहेर पडले.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;