Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, उद्धव ठाकरे यांच्याकडून दुःख आणि संताप!!

Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, उद्धव ठाकरे यांच्याकडून दुःख आणि संताप!!

कुंडमळ्यातील इंद्रायणी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

इंद्रायणीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात 55 पर्यटक बुडाल्याचे समोर आले. त्याचवेळी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली. आधी पंतप्रधानांनी उभारलेला पुतळा कोसळला. आता नवा पुतळा उभारला तर जमीन खचली. छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाबाबत पुन्हा एकदा हलगर्जीपणा झाला हे स्पष्ट दिसते. सरकार यावर आता कोणत्या तोंडाने खुलासा करणार? असा सवाल करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळय़ाचा खचलेला चबुतरा आणि पूल दुर्घटनेबाबत सरकारला धारेवर धरले. विकासाच्या फक्त गप्पा मारता, पण एका पुलाची उभारणी करता येत नाही. 55 पर्यटक त्या पुलावरून वाहून गेले. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असल्याचा ठपका उद्धव ठाकरे यांनी ठेवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;