एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाड; तासभर रखडले टेक ऑफ, गाझियाबादच्या विमानतळावर प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाड; तासभर रखडले टेक ऑफ, गाझियाबादच्या विमानतळावर प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणे सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ड्रीमलायनर विमान कोसळल्याच्या घटनेनंतरही विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरू राहिले आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते विमान तासभर विमानतळावरच रखडले. उड्डाणापूर्वी बिघाड निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला. तांत्रिक बिघाडानंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

एअर इंडिया एक्प्रेसचे विमान हिंडन विमानतळावरून कोलकाताच्या दिशेने उड्डाण घेणार होते, मात्र विमानाच्या उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाड आढळून आला. विमान उड्डाण करण्याच्या शेवटच्या क्षणी कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड दिसून आला. त्यानंतर बिघाडाच्या दुरुस्तीसाठी अभियंत्यांना पाचारण करण्यात आले, परंतु दुरुस्ती करण्यास तासभरापेक्षा अधिक वेळ गेल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. यावेळी एअर इंडिया प्रशासनाने प्रवाशांना तिकीट रद्द करून पूर्ण रक्कम परत घेण्याची ऑफर दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;