इराणला याची किंमत चुकवावी लागेल; तेल अवीवची पाहणी केल्यानंतर नेतान्याहू यांची गर्जना

इराणला याची किंमत चुकवावी लागेल; तेल अवीवची पाहणी केल्यानंतर नेतान्याहू यांची गर्जना

इस्रायल आणि इराणमधील युद्धाची तीव्रता वाढत आहे. दोन्ही देशांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दोन्ही देशांचे प्रंचड नुकसान झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या बात याम शहराला भेट दिली. या शहराचे इराणी हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. बात याम शहर राजधानी तेल अवीवच्या जवळ आहे. इराणी क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केलेल्या शहरातील इमारतींची पाहणी केल्यानंतर नेतान्याहू यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणला या विनाशाची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी गर्जना त्यांनी केली आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

महिला आणि मुलांसह निष्पाप नागरिकांना मारल्याबद्दल इराणला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. इराण जाणूनबुजून निवासी क्षेत्रांना लक्ष्य करत आहे. आम्ही आमचे ध्येय साध्य करू आणि आणखी तीव्र हल्ला करू, असे नेतान्याहू म्हणाले. इस्रायलसाठी हे युद्ध अस्तित्वाची लढाई आहे. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्रे इस्रायलसाठी विनाशकारी धोका आहे. निवासी भागांचे झालेले नुकसान पाहता, जर त्यांच्याकडे अण्वस्त्र असती तर होणाऱ्या विनाशाची कल्पनाच करवत नाही. अशा परिस्थितीत, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि अस्तित्वासाठी आम्ही हे युद्ध करत आहोत, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.

इस्रायल आणि इराणमधील युद्ध 13 जूनपासून सुरू आहे. इस्रायलने इराणच्या अणुतळांवर हल्ला केला आणि त्याला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले. त्यानंतर, इराणनेही ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ३’ सुरू करून प्रत्युत्तर दिले. आता नेतान्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;