शिक्षिकेच्या घरी चोरी करणारा अटकेत

शिक्षिकेच्या घरी चोरी  करणारा अटकेत

शिक्षिकेच्या घरी चोरी करणाऱ्याला मालाड पोलिसांनी अटक केली. रणजित उकेंद्रकुमार ऊर्फ मुन्ना असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार या शिक्षिका आहेत. त्या गोरेगाव येथील एका खासगी शाळेत शिकविण्याचे काम करत आहेत. मे महिन्यात त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले. त्यामुळे त्या वाराणसी येथे गेल्या. तेव्हा त्यांच्या घरी कोणी नव्हते. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरटा त्यांच्या घरात शिरला. चोरटय़ाने त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे कॉईन आणि पैसे चोरून पळ काढला. अंत्यविधी उरकून त्या घरी आल्या तेव्हा त्यांना घरपह्डी झाल्याचे लक्षात आले. घडल्याप्रकरणी त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोल्हापुरातील धरणांतून टप्प्याटप्याने विसर्ग; राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू कोल्हापुरातील धरणांतून टप्प्याटप्याने विसर्ग; राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वांची दैना उडत असल्याचे चित्र आहे. काहीकाळ पावसाच्या विश्रांतीमुळे काहीसा दिलासा मिळत असला, तरी अवघ्या...
‘ आता लग्नाचीही बनवाबनवी ! फसवणूक प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल
धोकादायक झाडांचे प्रस्ताव निकाली; उद्यान विभागाचा दावा
मटार महाग तर घेवड्याच्या भावात घट; मागणी कमी झाल्याने दर घसरले
जीवन अनिश्चित आहे, माझ्या मित्राने त्याचा मुलगा गमावला! संजय कपूर यांच्या निधनानंतर बिग बी झाले भावूक
पुन्हा पाढे पंचावन्न, बदली झाल्यानंतरही IAS अधिकारी शुभम गुप्ता यांचे कारनामे संपेना; आता सांगलीत लाच घेतल्याचा आरोप
हवाई दलाला फायटर ‘तेजस’ची ताकद! जूनच्या अखेरीस ‘तेजस एमके1 ए’ होणार दाखल