विमानातील ‘त्या’ लकी सीटची मागणी वाढली

विमानातील ‘त्या’ लकी सीटची मागणी वाढली

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात 11ए या सीटवर बसलेले प्रवासी विश्वासकुमार रमेश चमत्कारिकरीत्या वाचले. त्यानंतर विमान तिकिटांचे बुकिंग करताना प्रवाशांकडून 11ए या सीटची मागणी वाढली आहे.

गुरुवारपर्यंत अनेक विमान प्रवाशांना आपत्कालीन द्वार असलेली 11ए ही सीट नको होती. कारण त्यावर आरामदायी पद्धतीने बसता येत नाही, असे काहींचे म्हणणे असते, तर काहींना आपत्कालीन परिस्थितीत एक्झिट डोअर कसा उघडायचे हे माहीत नसते. अशा प्रकारे विविध कारणांसाठी या सीट नाकारल्या जात होत्या. मात्र आता या सीटची मागणी वाढली आहे.

कोलकातामधील ट्रव्हल एजंट्सनी सांगितले की, नेहमी प्रवास करणारे प्रवासी आपत्कालीन द्वार असलेल्या ठिकाणची जागा निवडत आहेत. यासाठी अधिक पैसे मोजण्यासही त्यांची हरकत नाही. तसेच गुरुवारच्या अपघातानंतर आता इतरांनीही या जागांबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली आहे. ट्रव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समिती सदस्य अनिल पंजाबी यांनी सांगितले की, आपत्कालीन द्वाराजवळ असलेल्या सीटबद्दलच्या प्रश्नांमध्ये आता वाढ झाली आहे, तर काहींना 11ए ही सीट हवी असते जरी ती आपत्कालीन द्वाराच्या शेजारी नसली तरी, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;