जेवढा मुद्देमाल तेवढे बक्षीस! गुन्हेगारांना पकडणारे पोलीस होणार मालामाल

जेवढा मुद्देमाल तेवढे बक्षीस! गुन्हेगारांना पकडणारे  पोलीस होणार मालामाल

गुन्हेगारांना पकडणारे पोलीस आता मालामाल होणार आहेत. गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे, पण ते बजावताना त्यांचे कसब लागते. अनेकदा जीव धोक्यात घालून त्यांना कारवाई करावी लागते. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना त्यांनी केलेल्या कारवाईनुसार जितका मुद्देमाल तितके रोख बक्षीस देण्याचा अभिनव उपक्रम पूर्व उपनगरांतील पोलीस ठाण्यांमध्ये राबवला जाणार आहे. पूर्व उपनगरातील परिमंडळ – 6 मधील चेंबूर, नेहरू नगर, ट्रॉम्बे, आरसीएफ, देवनार, शिवाजीनगर, टिळकनगर, चुनाभट्टी, मानखुर्द आणि गोवंडी अशा दहा पोलीस ठाण्यांमध्ये हा कारवाई दाखवा आणि बक्षीस मिळवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्करी, बेकायदा शस्त्र विक्री, मटका, जुगार यावर अधिक प्रभावीपणे कारवाई करणारे पोलीस ठाणे आणि पोलिसांना या उपक्रमांतर्गत रोख बक्षीस दिले जाणार आहे. असे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;