Air India Crash – ढिगाऱ्यात सापडला दुसरा ब्लॅक बॉक्स, विजय रुपाणींसह 80 मृतांची ओळख पटली

Air India Crash – ढिगाऱ्यात सापडला दुसरा ब्लॅक बॉक्स, विजय रुपाणींसह 80 मृतांची ओळख पटली

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झालेल्या ठिकाणी रविवारी दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला. ’एआय 171’ विमानाला अपघात कशामुळे झाला, हे शोधण्यासाठी अधिक तपास सुरु आहे. याचदरम्यान दुपारी विमानाचे अवशेष असलेल्या ढिगाऱ्यात दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला. या बॉक्समुळे विमान अपघात घडण्यापूर्वीच्या क्षणांचा ऑडिओ डाटा तपास यंत्रणांच्या हाती लागणार आहे. दरम्यान, रविवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 80 मृतांची ओळख पटवण्यात आली.

एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला गुरुवारी भीषण अपघात झाला. त्यात जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला, तर कित्येक स्थानिक लोक जखमी झाले. अपघातामागे घातपात आहे का, याचा अधिक तपास सात यंत्रणांमार्फत सुरु आहे. विमानाचे अवशेष असलेल्या ढिगाऱ्यातून पुरावे गोळा केले जात असताना रविवारी दुपारी अपघातग्रस्त ’एआय 171’ विमानाचा दुसरा ब्लॅक बॉक्स हाती लागला. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून अपघाताच्या तपासात उपयुक्त ठरणारी माहिती हाती लागेल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणेने आधीच अपघात घडलेल्या इमारतीच्या छतावरून डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर मिळवला आहे. दुसरा ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताच्या नेमक्या कारणाचा उलगडा करण्यात यश येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत विजय रुपाणी यांच्यासह 80 मृतांचे डीएनए नमुने त्यांच्या नातेवाईकांच्या नमुन्यांशी जुळवून मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. दरम्यान, रुपाणी यांच्यावर पार्थिवावर सोमवारी त्यांच्या राजकोट येथील गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने सोमवारी राज्यात दुखवटा जाहीर केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शरीराचा हा भाग सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो; उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहितीये का? शरीराचा हा भाग सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो; उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहितीये का?
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता धोकादायक मानली जाते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधेदुखीची समस्या वाढते. एवढंच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती...
उन्हाळ्यात नारळाचं तेल वापरणं खरंच योग्य? बहुतांश लोकांना माहित नाही या नैसर्गिक उपायाचे फायदे!
Kitchen Tips- हे पदार्थ कधीही नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत, वाचा
मुंबईत पूरही नाही येणार आणि लाखो लिटर पाणीही मिळणार, पालिका उभारणार नवीन पंपिंग स्टेशन
Kitchen Cleaning Tips: जळलेली स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा सविस्तर
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; राजापूरात पूर
मुसळधार पावसाची बॅटिंग सुरुच; राजवाडीतील गरम पाण्याच्या कुंडांना पुराच्या पाण्याने वेढले