स्कुल चले हम…… दिड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरु
अखेर दिड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये चिमरड्यांचा किलकिलाट सुरु झाला. पुण्यातील डीइएस शाळेत बालगोपाळांचे ढोल ताशाच्या गजरात, औक्षण करून शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी स्वागत केले. तसेच फ़ुगे, मिकीमाउस, सुस्वागतम, रांगोळीच्या पायघड्या, अशी प्रकारे शाळा सुशोभीत करण्यात आली होती. त्यासोबतच नवे सवंगडी, नवे शिक्षक, नवे दप्तर, घेऊन शाळेचा पहिला दिवस आनंदात सुरु झाला. गाणी, गप्पा, गोष्टी.. स्कुल चले हम…. म्हणत शाळा सुरु झाली. पाऊस सरी झेलत मुलांनी पहिला दिवस एन्जॉय केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List