एआय चोरतोय मोबाईलमधील तुमचा पर्सनल डेटा, तज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक बाब उघड

एआय चोरतोय मोबाईलमधील तुमचा पर्सनल डेटा, तज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक बाब उघड

आर्टिफिशल इंटेलिजन्सने ( एआय) आपल्या जीवनात शिरकाव केला आहे. चॅटजीपीटी, स्मार्टवॉच यासारख्या अनेक एआय प्रणालींची आपण संपर्कात येत आहोत. एआयमुळे जीवनात सुलभता आली असली तर वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मोबाईलमधील एआय तुमचा पर्सनल डेटा चोरत असल्याचे धक्कादायक बाब संशोधनातून उघड झाली आहे. वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठाचे सायबर सुरक्षा तज्ञ प्रा. ख्रिस्तोफर रामेझान यांनी एआय टुल्स दोन प्रकारे माहिती गोळा करतात असे सांगितले. जनरेटिव्ह एआय आणि प्रेडिक्टिव्ह एआय.

जनरेटिव्ह एआय – उदाहरणार्थ चॅट जीपीटी किंवा गुगल जेमिनी यामध्ये युजर्सने विचारलेला प्रश्न, किंवा उत्तर आणि सूचनांचा मजकूर गोळा केला जातो. ही माहिती पुढील प्रशिक्षणासाठी वापरली जाते. यातील काही मूलभूत माहिती कंपनीकडे साठवली जाते.

प्रेडिक्टिव्ह एआय – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक यावरील आपल्या प्रत्येक कृतीवर (पोस्ट, लाईक, कमेंट, व्हिडीओ बघण्याचा वेळ) नजर ठेवून आपले डिजिटल प्रोफाइल तयार करतात आणि आपल्या वर्तनाचे अंदाज बांधतात.

स्मार्टवॉच, फिटनेस ट्रेकर्स ही उपकरणे आवाज, लोकेशन, बायोमेट्रीक माहिती गोळा करतात. ही माहिती बहुतांश वेळा क्लाऊडवर साठवली जाते. ती प्रोफायलिंगसाठी वापरली जाण्याची शक्यता असते. एआय टुल्सने संकलित केलेली माहिती थर्ड पार्टीला शेअर करण्याची किंवा विकली जाण्याची शक्यता आहे.

काय कराल

  • वैयक्तिक माहिती शेअर करण्यास टाळा- एआय टूल्समध्ये नाव, जन्मतारीख, घरचा पत्ता, आधार क्रमांक यासारखी माहिती कधीही टाकू नका.
  • प्रोफेशनल डेटा सुरक्षित
  • कामाच्या ठिकाणी गोपनीय कागदपत्रे किंवा माहिती एआय चॅटवॉक्समध्ये शेअर करू नका.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – कोथरुडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात, तीन ते चार वाहने एकमेकांवर धडकली Pune News – कोथरुडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात, तीन ते चार वाहने एकमेकांवर धडकली
कुंडमळा येथील घटना ताजी असतानाच पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोथरुड येथील वेदभवन पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन ते...
घरुन शुटिंगसाठी गेली ती परतलीच नाही, तिसऱ्या दिवशी मॉडेलचा थेट मृतदेह आढळला
Photo – घंटा वाजली अन् शाळा सुरू झाली, बच्चे कंपनीचं शिक्षकांनी केलं जोरदार स्वागत
पावसाळ्यात फक्त एक चमचा मध खा, निरोगी राहा! वाचा
Dharashiv News – ऑनलाईन जुगाराने कुटुंबाचा शेवट केला, पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुकल्याला विष देऊन तरुणाने जीवन संपवलं
कांतारा चॅप्टर- 1 शूटिंग दरम्यान मोठी दुर्घटना, अभिनेता ऋषभ शेट्टी थोडक्यात बचावला!
शरीराचा हा भाग सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी शोषून घेतो; उन्हात बसण्याची योग्य पद्धत माहितीये का?