Israel-Iran Conflict : हिंदुस्थान-पाकिस्तानप्रमाणे इस्रायल-इराण वादही मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

Israel-Iran Conflict : हिंदुस्थान-पाकिस्तानप्रमाणे इस्रायल-इराण वादही मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात यश मिळवल्याचा हवाला देत, इस्रायल आणि इराण यांच्यातही शांतता प्रस्थापित करू शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. रविवारी ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडियावर एक पोस्ट करत असं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “इराण आणि इस्रायल यांनी एक करार केला पाहिजे आणि ते करतील, ज्याप्रमाणे मी हिंदुस्थान आणि पाकिस्तानला करार करण्यास भाग पाडले. त्या वेळी अमेरिकेशी व्यापाराच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या नेत्यांना समजावून सांगितले आणि त्यांनी त्वरित निर्णय घेऊन संघर्ष थांबवला.” “लवकरच इस्रायल आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित होईल,” असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, इस्रायलने इराणवरील हवाई हल्ले तिसऱ्या दिवशीही सुरू ठेवले असून इराणच्या नतांझ आणि इस्फहान येथील प्रमुख अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य केले आहे. सॅटेलाइट फोटोमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्रायलने हे हल्ले प्रतिबंधात्मक असल्याचे सांगितले असून, इराण अण्वस्त्रे विकसित करत असल्याचा आरोप केला आहे. इराणने मात्र हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;