शाब्बास पोरा…! हुशारीने अपहरणकर्त्यांना लावलं पळवून

शाब्बास पोरा…! हुशारीने अपहरणकर्त्यांना लावलं पळवून

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना न्यू एसटी कॉलनीमध्ये घडली. शाळेतून घरी जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. मुलाने आरडाओरडा केला. त्यामुळे अपहरणकर्ते पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अक्षित अजय सानप असे या मुलाचे नाव आहे. तो न्यू एसटी कॉलनी येथे राहतो. तो शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकतो. 13 जून रोजी तो शाळेत गेला होता. शाळेचा पहिला दिवस असल्याने सेलिब्रेशन ठेवले होते. त्यामुळे शाळा लवकर सुटली. मुलांना अडीच वाजता घरी जायला सांगितले. शाळेने याबाबत त्याच्या घरी माहिती दिली होती. अक्षितची शाळा घराच्या जवळच आहे. त्यामुळे तो पायी घरी निघाला होता. त्याचवेळी स्कूटीवरून आलेल्या दोघांनी त्याला थांबवले. त्यातील एकाने गाडीवरून उतरून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण अक्षितने आरडाओरड केली. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;