युद्धात आम्ही उतरणार नाही! नेत्यानाहू यांचा प्रस्ताव अमेरिकेने नाकारला

युद्धात आम्ही उतरणार नाही! नेत्यानाहू यांचा प्रस्ताव अमेरिकेने नाकारला

इस्रायलने इराणला पूर्ण बेचिराख करण्याच्या उद्देशाने सलग तिसऱया दिवशी हवाई हल्ले केले. इराणविरोधातील युद्धात इस्रायलने अमेरिकेलाही सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी तसा प्रस्ताव अमेरिकेपुढे ठेवला, मात्र युद्धात आम्ही पडणार नसल्याचे स्पष्ट करुन अमेरिकेने नेत्यानाहू यांचा प्रस्ताव नाकारला आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इराणचा अणु कार्यक्रम संपवण्यासाठी इस्रायलने मागील दोन दिवस ट्रम्प प्रशासनाला युद्धात सामील होण्याची विनंती केली. यासंदर्भात नेत्यानाहू यांनी सादर केलेला प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाने नाकारल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे. अमेरिकेने अणुकरारासाठी इराणला साठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. इतकेच नव्हे तर अणुकरार केला नाही तर भयंकर हल्ले करू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे इस्रायलकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांना अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते, मात्र अमेरिकेने इस्रायलच्या इराणविरोधातील कारवाईपासून स्वतःला दूर ठेवले आहे. युद्धात आम्ही पडणार नाही, असे स्पष्ट करुन इस्रायलचा युद्धात सामील होण्याचा प्रस्ताव अमेरिकेने धुडकावला आहे. इराणने अमेरिकेच्या टार्गेटवर हल्ला करून प्रत्युत्तर देणे बेकायदेशीर ठरेल, असे कारण ट्रम्प प्रशासनाने दिले आहे. ट्रम्प प्रशासन सध्यातरी इराणविरोधातील युद्धात सामील होण्याचा विचार करीत नाही. इराणवर हल्ला करण्याची ही वेळ नाही, असे अमेरिकेच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये

मी डील घडवले, तसे हे युद्धही मीच थांबवणार!

नुकताच हिंदुस्थान-पाकिस्तान या देशांतही मी युद्धविरामाचे डील घडवून आणले. तसाच इराण आणि इस्रायलमधील वॉरही मी थांबवणार, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सध्या फोन कॉल आणि बैठका सुरू आहेत, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;