ब्रिटनच्या लढाऊ विमानाचे केरळमध्ये इमर्जन्सी लँडिंग

ब्रिटनच्या लढाऊ विमानाचे केरळमध्ये इमर्जन्सी लँडिंग

अहमदाबादच्या विमान अपघातामुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विमान सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली असतानाच रविवारी केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रिटिश लढाऊ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इंधन संपल्यामुळे हे लँडिंग केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. ब्रिटिश लढाऊ विमान असल्याने लँडिंगवेळी विमानतळावरील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या होत्या.

अहमदाबादच्या विमानतळावर गुरुवारी एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान कोसळले. ती घटना ताजी असतानाच रविवारी ब्रिटिश एफ-35 या लढाऊ विमानाच्या लँडिंगबाबत तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षात संदेश आला आणि सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. ब्रिटिश एफ-35 हे लढाऊ विमान हिंदी महासागरावरून उड्डाण करीत होते. इंधनाचा साठा अचानक कमी झाल्यामुळे विमान तिरुअनंतपुरम विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. संभाव्य अपघाताच्या भीतीने लढाऊ विमानाच्या वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगची परवानगी एटीसीकडे मागितली होती. त्यानुसार एटीसीने सिग्नल दिल्यानंतर विमानाचे तिरुअनंतपुरम विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

हवाई दलाने दिली लँडिंगला परवानगी

इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागणारे विमान ब्रिटनचे लढाऊ विमान असल्याने चिंता वाढली होती. त्याच चिंतेतून एटीसीने हवाई दलाशी संपर्क केला होता. त्यावर लढाऊ विमानापासून कुठलाही धोका नसल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर लँडिंगसाठी ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला होता. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र लँडिंगच्या तपशीलावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;