जीवन अनिश्चित आहे, माझ्या मित्राने त्याचा मुलगा गमावला! संजय कपूर यांच्या निधनानंतर बिग बी झाले भावूक

जीवन अनिश्चित आहे, माझ्या मित्राने त्याचा मुलगा गमावला! संजय कपूर यांच्या निधनानंतर बिग बी झाले भावूक

अमिताभ बच्चन हे कायम सोशल मीडियावर सतर्क असतात. अलीकडेच करिश्मा कपूरच्या पतीच्या निधनाबद्दलही अमिताभ यांनी आता संवेदना व्यक्त केल्या आहेत. बिग बी यांनी अलीकडेच त्यांच्या व्हीलॉगमध्ये करिश्मा कपूरचा पूर्वीश्रमीचा पती संजय कपूरच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या मित्राने त्याचा मुलगा गमावला आहे’. 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार दिल्लीत होणार आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी संजय कपूर यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. बिग बी भावुक झाले आणि पोस्टमध्ये लिहिले आहे की, जीवन अनिश्चित आहे.

बिग बी यांनी व्लॉगमध्ये कोणाचेही नाव लिहिले नाही. “आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे की जीवन अनिश्चित आहे.” बिग बी यांनी पुढे लिहिले, “आज माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी दु:खाने भरलेली आणखी एक सकाळ आहे. माझ्या सर्वात जवळच्या मित्राने त्याचा मुलगा गमावला. तरुण आणि उत्साही असा. माझ्या आणि माझ्या मित्रासाठी हे दुःख आणि वेदना कल्पनाही करता येत नाहीत आणि हे घडले आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सध्या आपण काय करु तरी ती फक्त प्रार्थना आहे. जवळच्यांना त्यांच्यासोबत उभे राहूनच धीर देता येतो.

संजय कपूर यांचा मृत्यू कसा झाला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूरने इंग्लंडमध्ये पोलो खेळताना मधमाशी गिळली होती. ज्यामुळे त्याला घशात चावा लागला आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;