एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड, कोलकाता-हिंडन विमानसेवा काही काळ स्थगित

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड, कोलकाता-हिंडन विमानसेवा काही काळ स्थगित

हिंडन विमानतळावरून कोलकाताला निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ विमान धावपट्टीवरच अडकले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास झाला. एअर इंडिया एक्सप्रेसने निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली. तसेच प्रवासात आलेल्या या व्यत्ययाबाबत माफी मागितली आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरून कोलकाताला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान नियोजित वेळेत निघाले. मात्र उड्डाण घेणार इतक्यात शेवटच्या क्षणी विमानात काही तांत्रिक बिघाड आढळून आल्याने उड्डाणाला विलंब झाला. विमानात नेमका काय बिघाड झाला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने हिंडन-कोलकाता विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रवास पुन्हा शेड्यूल करण्याची किंवा तिकिट रद्द करण्याची ऑफर देण्यात आली होती. आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर विमान रवाना झाल्याचे एअर इंडिया एक्प्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;