चंद्रपुरात पिसाळलेल्या हत्तींचा वृद्धावर हल्ला; वृद्धाचा जागीच मृत्यू

चंद्रपुरात पिसाळलेल्या हत्तींचा वृद्धावर हल्ला; वृद्धाचा जागीच मृत्यू

चंद्रपूर जिह्यात गेल्या काही दिवसांपासून दोन पिसाळलेल्या हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत आज सकाळी या हत्तींनी एका वृद्धावर हल्ला करत त्याला चिरडले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर वन विभागाने दोन्ही हत्तींचा शोध घेणे सुरू केला आहे.

सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावातील काही शेतकरी धान पेरणीसाठी शेताकडे जात असताना आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला गावालगतच्या जंगलातून अचानक दोन रानटी हत्ती बाहेर आले. त्यांनी शेतकऱयांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. मात्र याच दरम्यान मारोती मसराम (60) हे शौचासाठी घराबाहेर आले होते. हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. लकवा झालेल्या मारोती यांना पळता आले नाही. हत्तीने त्यांना पायाखाली चिरडले तर दुसऱयाने सोंडेने उचलून जमिनीवर आपटले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि पाच मुले असा परिवार आहे.

घुसखोर हत्तींचा ताबडतोब बंदोबस्त करा !

गडचिरोली जिह्यातून उमा नदी पार करत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातून काही दिवसांपूर्वी दोन हत्तींनी घुसखोरी करत सिंदेवाही आणि सावली तालुक्त्यात प्रवेश केला होता. तेव्हापासून सिंदेवाही व सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांची दहशत निर्माण झालेली आहे. काही गावांमधील रहिवाशांवर हल्लेही केले होते. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला असून वन विभाग आणि प्रशासनाने या घुसखोरी केलेल्या हत्तींचा ताबडतोब बंदोबस्त करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;