हवाई दलाला फायटर ‘तेजस’ची ताकद! जूनच्या अखेरीस ‘तेजस एमके1 ए’ होणार दाखल

हवाई दलाला फायटर ‘तेजस’ची ताकद! जूनच्या अखेरीस ‘तेजस एमके1 ए’ होणार दाखल

हवाई दलाच्या ताफ्यात या महिन्याच्या अखेरीस एक नवीन विमान सामील होणार आहे. हे स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान एमके 1 ए असेल. सर्व चाचण्या झाल्यानंतर लढाऊ विमान हवाई दलाला मिळेल. फेब्रुवारी 2021 मध्ये, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत 83 तेजस एमके 1 ए विमानांसाठी 48 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला. त्यांची डिलिव्हरी मार्च 2024 मध्ये होणार होती, परंतु अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिककडून इंजिन पुरवठ्यास विलंब झाल्यामुळे डिलिव्हरीला तब्बल दीड वर्षांचा विलंब झाला. मात्र मार्च महिन्यापासून नवीन इंजिन येण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस 12 तेजस एमके 1ए विमाने हवाई दलाला सुपूर्द केली जातील.

काही दिवसांपूर्वी हवाई दलप्रमुखांनी तेजस लढाऊ विमानांच्या पुरवठ्यात होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, 40 विमाने अद्याप दलाला देण्यात आलेली नाहीत. आपण अशी आश्वासने का देतो जी पूर्ण करता येत नाहीत?

मिग-21, मिग-27 आणि जग्वारची जागा घेईल

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मजबूत हेतूंसह सरकारने सरकारने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत एकूण 180 तेजस एमके 1 ए साठी करार केला आहे. पहिल्या खेपमध्ये 83 विमानांचा तर दुसऱया खेपमध्ये 97 विमानांचा समावेश आहे ज्याची किंमत 67 हजार कोटी रुपये आहे.

हवाई दलातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडणाऱ्या मिग-21, मिग-27 आणि जग्वारची जागा तेजस घेईल. हवाई दलाच्या ताफ्यात 42 विमाने असायला हवी होती, जी आता 30 पर्यंत कमी करण्यात आली आहे. एका दशकात तेजस एमके 1, एमके 1ए, एमके 2 ची 350 हून अधिक जेट्स हवाई दलात सामील होतील. पहिले तेजस एमके 2 2028-29 मध्ये मिळू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;