शाळेतच मिळणार एसटी पास

शाळेतच मिळणार एसटी पास

शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया लाखो विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास शाळेतच मिळणार आहेत. एसटी महामंडळ विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम सोमवारपासून राबवणार आहे. शाळांनी दिलेल्या यादीनुसार विद्यार्थ्यांचे एसटी पास शाळेत दिले जाणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशीच ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या विशेष मोहिमेचा श्रीगणेशा केला जाणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटीच्या माध्यमातून 66.66 टक्के सवलत दिली आहे. विद्यार्थ्यांना केवळ 33.33 टक्के रक्कम भरून एसटीचा मासिक पास काढता येतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;