IND Vs ENG Test – सचिन तेंडुलकरने जिंकलं सर्वांच मन, पतौडी नावाचा दबदबा कायम राहणार!

IND Vs ENG Test – सचिन तेंडुलकरने जिंकलं सर्वांच मन, पतौडी नावाचा दबदबा कायम राहणार!

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंडच त्यांच्याच घरात पानिपत करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. मालिका सुरू होण्यापूर्वीच मालिकेच्या नावावरून जोरदार चर्चा रंगली होती. या करंडकाच नाव बदलून तेंडुलकर-ऍण्डरसन असे करण्यात आलं आहे. परंतु आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने BCCI आणि ECB च्या प्रमुखांची यासंदर्भात चर्चा केली आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून पतौडी करंडकाची सुरुवात झाली होती. टीम इंडियाचे दोन दिग्गज कर्णधार इफ्तिखार अली खान पतौडी आणि मन्सूर अली खान पतौडी यांचं नाव करंडकाला देण्यात आलं होतं. मात्र, यावर्षी “पतौडी करंडक” हे नाव काढून त्याजागी या करंडकाला सतिन तेंडुलकर आणि जेम्स ऍण्डरसन या दिग्गज खेळाडूंची नाव देण्यात आली. त्यामुळे चाहत्यांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच हा पतौडी कुटुंबाच्या योगदानाच अपमान असल्याच सुद्धा काही माजी खेळाडूंनी म्हटलं होतं. परंतु आता खुद्ध सचिन तेंडूलकरने BCCI आणि ECB च्या प्रमुखांसोबत पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल चर्चा केली आहे. “ज्यांनी हिंदुस्थान आणि इंग्लंड दोघांसाठी क्रिकेट खेळलं, अशा पतौडी कुटुंबाचा योगदान पुसून टाकनं चुकीचं आहे.” असे सचिन तेंडुलकर म्हणाला आहे.

Hillang Yajik – शरीरसौष्ठवाच्या सौंदर्यानं जिंकलं सोनं, अरुणाचलच्या हिलांग याजिकनं रचला इतिहास

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीय आणि ईसीबी सचिन तेंडुलकरच्या मताशी सहमत आहेत. पतौडी कुटुंबाच योगदान कोणत्याही परिस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये कायम राहिलच पाहिजे. परंतु ही सर्व प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडणार, हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. पतौडी यांच्या नावावरून मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला किंवा मालिका जिंकणाऱ्या कर्णधाराला एखादा विशेष पुरस्कार दिला जाऊ शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;