शिवसेनेच्या महारक्तदान शिबिरात 3198 पिशव्या रक्त संकलन; विक्रोळीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या महारक्तदान शिबिरात 3198 पिशव्या रक्त संकलन; विक्रोळीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईतील रुग्णालयांमध्ये रक्ततुटवडा भासू नये तसेच रुग्णांना जीवनदान मिळावे या सामाजिक बांधिलकीतून विक्रोळी मतदारसंघात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महारक्तदान शिबिराला विक्रोळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात 3 हजार 198 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यात आणि उपक्रमात शिवसेना कायमच एक पाऊल पुढे असते. ज्या ज्या वेळेस मुंबईत किंवा राज्याला जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा सर्वात जास्त रक्त संकलन शिवसेनेकडून केले जाते. रक्ताअभावी कोणाच्या जिवावर बेतू नये यासाठी आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळीत महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होऊन रक्तदान करा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो विक्रोळीकरांनी रक्तदान केले.

शिबिरात सर्व वयोगटातील रहिवासी सहभागी झाले होते. शिबिरातून एकूण 3 हजार 198 रक्तदात्यांनी सामाजिक भान राखत रक्तदान केले. त्याचबरोबर रक्तदात्यांनी शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सुनील राऊत यांचे आभार मानले. शिबिराला शिवसेना नेते सुभाष देसाई, विभागप्रमुख, माजी आमदार रमेश कोरगावकर, बाबा कदम, राजोल पाटील, परम यादव, सिद्धी जाधव, आनंद पाताडे, रश्मी पहुडकर, चंद्रशेखर जाधव, विश्वास शिंदे, नीलेश साळुंखे, संदीप सावंत, धर्मनाथ पंत, उत्तम कुराडे, शंकर ढमाले, सुषमा आमरे, दीपाली पाटील, दीपक सावंत, रवींद्र महाडिक, अभय राणे, किशोर पाटील, प्रकाश पुजारी, संतोष शिंदे, सुधाकर पेडणेकर, नीलेश पोहकर, सचिन मदने, विजय कुरकुटे, शिवसेनेचे विक्रोळीतील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;