सेलेबीच्या याचिकेवर 10 जुलैला सुनावणी, विमानतळ करार रद्द
हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच हिंदुस्थानच्या विमान वाहतूक सुरक्षा नियामक (बीसीएएस) ने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी तत्काळ रद्द केली. या निर्णयामुळे सेलेबी कंपनीचा मुंबई विमानतळावरील करारही रद्द करण्यात आला. त्यामुळे कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर 10 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
तुकाaच्या सेलेबीची उपकंपनी सेलेबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस ही मुंबई विमानतळावर सेवा देते. करार अचानक रद्द केल्याने कंपनीचे नुकसान होत आहे. या प्रकरणी कंपनीने हायकोर्टात तीन याचिका दाखल केल्या असून सुरक्षा मंजुरी आणि करार संपुष्टात आणण्याच्या केंद्राच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी सोलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितले की, सात विमानतळ प्राधिकरणांनी कंपनीची सेवा बंद केली आहे. या प्रकरणी कंपनीने दिल्ली उच्च न्यायालय तसेच मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून हायकोर्टाच्या निकालानंतरच निर्णय जाहीर करणार असल्याचे मद्रास न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List