इराण-इस्रायलच्या युद्धात शेअर बाजार ‘बॅटल झोन’मध्ये; दिशाहीन बाजारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात

इराण-इस्रायलच्या युद्धात शेअर बाजार ‘बॅटल झोन’मध्ये; दिशाहीन बाजारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात

इराण- इस्रायल युद्धामुळे सर्व जगाची चिंता वाढली आहे. तसेच दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक आर्थिक परिस्थितीसह शेअर बाजारावरही होत आहे. या युद्धामुळे शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या नजरा सोमवारच्या बाजाराच्या घडामोडींकडे होत्या. मात्र, आज बाजाराची वाटचाल दिशाहीन वाटचाल करत असल्याने गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.

इराण- इस्रायल युद्धामुळे शेअर बाजारात दबाव आहे. बाजाराला वर नेण्यासाठी बुल प्रयत्न करत आहेत. तर बाजार पाडून नफावसुलीसाठी बेअर पंजा मारत आहे. त्यामुळए शेअर बाजार बॅटल झोनमध्ये आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी प्रिमार्केट सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून आले. त्यामुळे बाजार घसरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, बाजाराची सुरुवात किरकोळ तेजीने झाली असून अजूनही चढउतार होत आहेत. बाजाराची सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 180 अंकांनी वधारला. तर निफ्टी 24700 अकांच्या च्या पुढे गेला. तर बँक निफ्टी 55,554.10 वर होता. त्यात नंतर सुमारे 100 अंकांची घसरण झाली. तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार होत आहेत.

बाजाराचे व्यवहार सुरू झाल्यावरही बाजाराची निश्चित दिशा समजत नसल्याने गुंतवणूकदारांनी सावधतेने व्यवहार करावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 1303.18 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीतही घसरण दिसून आली. मात्र, बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत दिसले. त्यामुळे गुंतवणूकदाराही संभ्रमात आहेत. शेअर मार्केटच्या या व्यवहारातून मिश्र संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी वाढ दिसून येत आहे. तसेच आशिया आणि डाऊ फ्युचर्समध्येही वाढ झाली. इस्रायल- इराण युद्धामुळे क्रूड ऑइल ,सोने चांदी वायदे बाजारात तेजीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;