राम दरबार भाविकांसाठी खुला, दिवसाला 1800 भाविकांना दर्शन घेता येणार

राम दरबार भाविकांसाठी खुला, दिवसाला 1800 भाविकांना दर्शन घेता येणार

अयोध्येत राममंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेला राम दरबार भाविकांसाठी शनिवारी खुला करण्यात आला. राम मंदिर ट्रस्टने राम दरबार खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रामलल्लाच्या दर्शनासह आत राम दरबारालाचेही दर्शन घेता येईल. त्यासाठी पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवसभरात 1800 भाविकांना पासच्या आधारे राम दरबाराचे दर्शन घेता येणार आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य अनिल मिश्रा यांनी राम दरबार खुला करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. स्थानिक प्रशासनासोबतच्या बैठकीनंतर श्रीराम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी भाविकांसाठी राम दरबार खुला करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले. राम दरबाराच्या दर्शनासाठी एका दिवसात सहा स्लॉट असतील. सकाळी 7 ते 9, 9 ते 12, दुपारी 1 ते 3, त्यानंतर 3 ते 5, सायंकाळी 5 ते 7 आणि 7 ते 9 असे स्लॉट असतील. प्रत्येक
स्लॉटमध्ये 300 पास उपलब्ध करून दिले जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;