गिरगावमध्ये मेट्रो स्थानकाजवळील रस्ता खचला; बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली

गिरगावमध्ये मेट्रो स्थानकाजवळील रस्ता खचला; बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली

मुंबईतील गिरगावमध्ये ठाकूरद्वार परिसरात मेट्रो स्थानकाजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. रस्ता खचल्यामुळे बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली आहे. हा रहदारीचा रस्ता असल्याने तसेच सकाळच्या वेळी ऑफीसला जाण्यासाठी चाकमान्यांची वर्दळ असतानाच हा अपघात घडला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

गिरगाव परिसरात मेट्रो 3 कुलाबा- वांद्रेचे काम सुरू आहे. गिरगाव मेट्रो स्थानकाचे या परिसरात काम सुरू आहे. त्याशेजारील रस्ता खचल्याने बस बेस्ट पाच फूल खोल खड्ड्यात अडकली. बसचे चाक पाच फूट खोल गेले आहे. त्यामुळे बस कलंडली आहे. मुंबई पाऊस सुरू असल्याने त्यात ही घटना घडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. बसचे चाक खड्ड्यात रुतल्याने बस कलंडत असल्याने प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

याआधी याच परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना अवजड क्रेन कोसळली होती. त्यावेळी हा मार्ग तीन दिवस बंद होता. तसेच मेट्रोचे सुरू असणारे काम, जनतेला होणारा त्रास आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;