India Tour Of England – सरफराजची बॅट पुन्हा तळपली, 76 चेंडूत ठोकल्या 101 धावा

India Tour Of England – सरफराजची बॅट पुन्हा तळपली, 76 चेंडूत ठोकल्या 101 धावा

इंग्लंडविरुद्ध धमाकेदार कामगिरी करण्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरू आहे. बेकेनहॅममध्ये टीम इंडिया आपआपसात चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्यात इंडिया ए कडून खेळताना सरफराज खानने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. त्याने 76 चेंडूमध्ये 101 धावांनी नाबाद खेळी करत जसप्रती बुमराह आणि अर्शदिप सिंग सारख्या टीम इंडियाच्या मुख्य गोलंदाजांना समचारा घेतला.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आपआपसाच चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. इंडिया ए कडून खेळताना सरफराज खानव्यतिरिक्त इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांनी सुद्धा चमकदार कामगिरी केली. इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 459 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंडिया ए च्या फलंदाजांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. सरफराज खानने 76 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची शतकीय खेळी केली. त्याचबरोबर इशान किशन सुद्धा संयमी फलंदाजी करताना दिसत असून आला, तो 45 धावांवर नाबाद आहे. इंडिया ए ने दिवसाअखेर सहा गड्यांच्या मोबदल्यात 299 धावा केल्या आहेत.

IND Vs ENG Test – सचिन तेंडुलकरने जिंकलं सर्वांच मन, पतौडी नावाचा दबदबा कायम राहणार!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;