बासरच्या गोदापात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू

बासरच्या गोदापात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू

दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील बासर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी 1 वाजता घडली.

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील चिंतल बाजार येथील 18 भाविक दक्षिण हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेल्या लेल्या बासर येथे श्री सरस्वती मातेचे दर्शन घेऊन गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने राकेश (17), विनोद (18), मदन (18), ऋतिक (17) व भरत (18) या पाच भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बासर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कुमार, सर्कल इन्स्पेक्टर किरण रेड्डी, पोलीस अधिकारी गणेश, पोलीस अधिकारी जी. गंगासागर आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने पाचही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवून दिले.

बासर येथील गोदावरी नदीपात्रात एका बोटीच्या सहाय्याने 18 भाविक नदीपात्रात गेले होते. नदीपात्रात मध्यभागी गेल्यानंतर त्या ठिकाणी बोटीतील पाच भाविक पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. मात्र पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी केला होता मज्जाव

दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी घटना घडलेले ठिकाण धोकादायक असल्याने तेथे बोट नेऊ नका असे बोटचालकांना बजावले.होते. त्यानंतरही बोट चालकाने धोकादायक ठिकाणी बोट नेल्यामुळे या बोट चालकास ताब्यात घेतल्याची माहिती बासर पोलिसांनी दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;