आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कराल, तर पूर्ण ताकदीने कारवाई करू! ट्रम्प यांची इराणला धमकी

आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कराल, तर पूर्ण ताकदीने कारवाई करू! ट्रम्प यांची इराणला धमकी

आखातात युद्धजन्य परिस्थिती असतानाच अमेरिकेने युद्धाच्या भडक्यात आणखी तेल ओतले आहे. मधे पडाल तर महागात पडेल, असा सज्जड दम इराणने अमेरिकेला दिला होता. त्यावर अमेरिकेने जबरदस्त उत्तर दिले. आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कराल तर अमेरिकन सैन्य त्याविरुद्ध पूर्ण ताकदीने कारवाई करेल. यापूर्वी कधी पाहिले नसेल आणि विचारही केला नसेल अशा परिणामांना तोंड द्यावे लागेल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला दिली.

इस्रायल आणि इराण या दोन देशांतील संघर्ष विकोपाला गेला असतानाच त्यात अमेरिकेने लूडबूड सुरू ठेवली आहे. ट्रम्प यांच्या नाक खुपसण्याच्या भूमिकेवर इराणने शनिवारी सडेतोड इशारा दिला होता. त्यामुळे खवळलेल्या ट्रम्प यांनी रविवारी इराणला इतिहासात कधी पाहिले नसेल अशा भयंकर परिणामांना सामोरे जाण्यास तयारी ठेवण्याची धमकी दिली. इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमागे अमेरिकेचा हात आहे या कारणावरून इराणने इस्रायलला टार्गेट करण्याबरोबर अमेरिकेला निशाण्यावर ठेवले आहे. इस्रायलने रविवारी इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा ट्रम्प यांनी यावेळी केला.

इराण व इस्रायलमध्ये  करार करण्याचा प्रस्ताव

ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये करार करण्याचा प्रस्तावही दिला. आपण इराण व इस्रायलमध्ये सहजपणे करार करू शकतो आणि रक्तरंजित संघर्ष संपवू शकतो, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियातील पोस्टमधून स्पष्ट केले. तथापि, ट्रम्प यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे इराणकडून अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला जाण्याची शक्यता धूसर आहे. अणुकरार केला नाही तर आणखी भयंकर हल्ले करू, असा इशारा ट्रम्प यांनी इराणला वारंवार दिला आहे.

लष्करी परेड, वाढदिवसावर ट्रम्प यांनी उडवले 350 कोटी

इस्रायल-इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष आहे. यादरम्यान अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरुद्ध जनक्षोभ उसळला आहे. ट्रम्प यांनी त्यांचा वाढदिवस आणि अमेरिकन सैन्याच्या 250 व्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन साजरे करताना तब्बल 350 कोटी रुपयांचा चुराडा केला. त्यांच्या या उधळपट्टीमुळे जनतेच्या संतापाचा भडका उडाला आणि ट्रम्प यांचा निषेध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;