रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला! फुटपाथ झाले गायब, पादचाऱ्यांची ‘वाट’ बिकट,जनजागृतीसाठी आरटीओची भरारी पथके जागोजागी सक्रिय

रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला! फुटपाथ झाले गायब, पादचाऱ्यांची ‘वाट’ बिकट,जनजागृतीसाठी आरटीओची भरारी पथके जागोजागी सक्रिय

>> मंगेश मोरे

शहर व उपनगरांतील बहुतांश रस्त्यांवरील फूटपाथ गायब झाल्याने पादचाऱ्यांची ‘वाट’ बिकट झाली आहे. अनेक पादचारी रस्त्यावरून चालत असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) आता ‘रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला’ अशी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. जनजागृतीसाठी आरटीओची भरारी पथके जागोजागी सक्रिय झाली आहेत. दरम्यान, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल पादचाऱ्यांकडून केला जात आहे.

रस्त्यांचे रुंदीकरण, दुकानांचे बेकायदा अतिरिक्त बांधकाम, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आदी गोष्टींमुळे अनेक ठिकाणी फूटपाथ शिल्लक राहिलेले नाहीत. अशा परिसरात पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. मात्र पादचारी डाव्या बाजूने चालण्याचा नियम पाळत असल्याने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडय़ांची धडक बसते. त्यात पादचाऱ्यांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी आरटीओमार्फत पादचाऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शाळा-कॉलेजसह इतर सार्वजनिक ठिकाणी आरटीओचे कर्मचारी-अधिकारी जाऊन लोकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन करीत आहेत. यासंदर्भात पत्रके तसेच जागोजागी फलक लावून संदेश दिला जात आहे.

गेल्या काही वर्षांत पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱयांना मागून येणाऱ्या भरधाव वाहनांचा अंदाज येत नाही. त्यादृष्टीने आम्ही पादचाऱ्यांना फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन करीत आहोत. आरटीओने पादचारी सुरक्षेसाठी हे जनजागृतीचे पाऊल उचलले आहे.

श्याम कासार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरिवली

चार आरटीओ, सात भरारी पथके

मुंबई शहर व उपनगरांत ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली कार्यालये कार्यान्वित आहेत. यापैकी ताडदेव, वडाळा व अंधेरी कार्यालयात प्रत्येकी दोन भरारी पथके, तर बोरिवली आरटीओ कार्यालया अंतर्गत एक भरारी पथक पादचाऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले आहे.

मुंबई-ठाण्याहून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला अनेक भक्तगण पायी चालत जातात. ते भक्तही अनेकदा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात. त्यामुळे अपघाताची भीती असल्याने साईभक्त मंडळांमध्येदेखील जनजागृती करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;