गडचिरोलीत 1 लाख झाडांची होणार कत्तल, लोह खनिज प्रकल्पासाठी जंगलतोडीला केंद्र सरकारची मंजुरी

गडचिरोलीत 1 लाख झाडांची होणार कत्तल, लोह खनिज प्रकल्पासाठी जंगलतोडीला केंद्र सरकारची मंजुरी

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने (EAC) गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड खाणीत लोह खनिज उत्पादन 10 दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) वरून 26 दशलक्ष टन प्रति वर्षापर्यंत वाढवण्याच्या योजनेस पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे 937 हेक्टर वन जमीन खाणकामासाठी वापरली जाणार असून, 1.23 लाख झाडांची कत्तल होणार आहे. हा प्रकल्प नक्षलग्रस्त भागात आहे. या प्रकल्पाबाबत स्थानिक आदिवासी समुदाय आणि पर्यावरणवादी यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी समुदायाकडून तीव्र विरोध होत आहे. प्रकल्पामुळे 937 हेक्टर जंगल नष्ट होणार असून, याचा स्थानिक पर्यावरणावर आणि आदिवासींच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे 30 ते 40 गावांतील 50,000 हून अधिक लोक विस्थापित होतील, अशी भीतीही व्यक्ती केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;