Mumbai News – पत्नीवर गोळ्या झाडून पतीने स्वतःलाही संपवले, वरळीतील खळबळजनक घटना

Mumbai News – पत्नीवर गोळ्या झाडून पतीने स्वतःलाही संपवले, वरळीतील खळबळजनक घटना

मुंबईतील वरळी परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर पतीने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्या कारणातून हत्या आणि आत्महत्या झाली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

देशी बनावटीच्या पिस्तुलमधून रविवारी सकाळी पतीने गोळी झाडली. ही पिस्तुल आरोपीकडे कुठून आली याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळवरून पिस्तुल जप्त केली आहे. दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;