पत्र पाठवा… उत्तर देतो, महाराष्ट्रातील निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधींचा लेख आयोगाला झोंबला

पत्र पाठवा… उत्तर देतो, महाराष्ट्रातील निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधींचा लेख आयोगाला झोंबला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळय़ाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखानंतर चौफेर टीका होऊ लागल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलेच झोंबले आहे. आयोगाने आज त्यावर स्पष्टीकरणही दिले. मीडियामधून विचारणा करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवा, उत्तर देतो, असे आयोगाने म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रश्नांबाबत

24 डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून त्यात सर्व मुद्दय़ांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे, असा दावा आयोगाने केला आहे. ‘निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत. राहुल गांधी यांनीही माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा.’ असे आयोगाने स्पष्टीकरणात म्हटले आहे.

राहुल गांधींनी आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजपाकडून उत्तरे म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच असून, विधानसभा निवडणूक प्रक्रियेत घोटाळा नव्हता तर मारकडवाडीत माक पोल का होऊ दिला नाही, असा सवाल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला, तर आम्ही पुराव्यानिशी मतदार याद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिंमत असेल तर भाजप नेत्यांनी ते खोडून दाखवावे, असे आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा – काँग्रेस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नाकाx टेस्ट करा, अशी मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;