कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर जीवघेणा हल्ला, 15 वर्षांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडली

कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर जीवघेणा हल्ला, 15 वर्षांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडली

कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बोगोटा येथे एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिगुएल उरीबे हे डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. शनिवारी बोगोटा येथे एका उद्यानामध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. जवळून झाडलेली गोळी त्यांच्या पाठीत आणि डोक्यात घुसली. यानंतर उरीबे हे रक्तबंबाळ अवस्थेत मंचावर कोसळले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल
आपण अनेकदा म्हणतो की फळांचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर असते. पण हे 90 टक्के लोकांना माहित नसेल की असेही काही...
झोपताना ही 5 लक्षणे दिसली तर ब्रेन ट्यूमर असू शकतो, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
चुटकीसरशी हवंय स्वच्छ घर? वापरून बघा हे घरगुती क्लिनिंग सोल्यूशन्स!
फफूंदी, किडींपासून गव्हाचे संरक्षण करण्यासाठी आजमवा हे पारंपरिक उपाय…
अंडरआर्म्समध्ये तुरटी लावल्याने काय होते? जाणून थक्क व्हालं
Photo – रिंकू सिंहला ‘क्लीन बोल्ड’ करणाऱ्या खासदार प्रिया सरोज यांना सारखरपुड्यात अश्रू अनावर
किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, स्वराज्याच्या राजधानीत शिवभक्तीचा जागर