India-Pakistan War – चुकीची माहिती, बनावट बातम्या अन् काल्पनिक युद्धाचं जाळं; ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची हिंदुस्थानच्या टीव्ही माध्यमांवर टीका

India-Pakistan War – चुकीची माहिती, बनावट बातम्या अन् काल्पनिक युद्धाचं जाळं; ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची हिंदुस्थानच्या टीव्ही माध्यमांवर टीका

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात हिंदुस्थानी टीव्ही माध्यमांनी अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने पाकमधील बंडाच्या आणि दोन अण्वस्त्रधारी देशांमधील युद्धाच्या बनावट बातम्या प्रसिद्ध केल्याची टीका ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या आघाडीच्या वृत्तपत्राने एका रिपोर्टद्वारे केली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान पुरता बिथरला होता. 9 मे 2025 रोजी पाकिस्तानने हिंदुस्थानच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानने जवळपास सर्व हल्ले हाणून पाडले. त्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली. या काळात हिंदुस्थानच्या टीव्ही माध्यमांनी अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने अनेक ‘ब्रेकिंग न्यूज’ दिल्या. व्हॉट्सअप संदेश, अज्ञात सूत्र आणि सोशल मीडियावरील अफवांच्या मदतीने काल्पनिक युद्धाचे जाळे विणले.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांन अटक करण्यात आली, पाकिस्तानमध्ये बंड झाले असून सत्तापालट सुरू आहे, असे वृत्त देण्यात आले. मात्र हे वृत्त खोटे होते. उलट मुनीर यांना हिंदुस्थान-पाकिस्तान तणाव निवळल्यानंतर फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली. एवढेच नाही तर हिंदुस्थानी सैन्य पाकिस्तानमध्ये घुसले आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान शरण आले, बंकरमध्ये लपले, पाकिस्तानचे कराची बंदर क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करण्यात आले, शहरे उडवण्यात आली, असे वृत्तही काही माध्यमांनी दिले. प्रत्यक्षात काय घडतेय हे माहिती नसताना अशा निर्णायक क्षणी चुकीची आणि भ्रम निर्माण करणारी माहिती देण्यात आली. याचा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने चांगलाच समाचार घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;