किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, स्वराज्याच्या राजधानीत शिवभक्तीचा जागर

किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, स्वराज्याच्या राजधानीत शिवभक्तीचा जागर

छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवशक 352 या तिथीनुसार साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सोमवार 9 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होणार आहे. हा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावरती दाखल झाले आहेत. राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्व दिनी शिरकाई देवीच्या पूजनापासून या सोहळ्याला सुरुवात झाला असून शिवभक्तीच्या जागरात संपूर्ण रायगड दुमदुमून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड व कोकणकडा मित्र मंडळ, रायगड यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;